मध्य प्रदेश निवडणुकीतही भाजपला धक्का बसणार, काँग्रेसला मिळणार ‘एवढ्या’ जागा ?

मध्य प्रदेश निवडणुकीतही भाजपला धक्का बसणार, काँग्रेसला मिळणार ‘एवढ्या’ जागा ?

नवी दिल्ली – मध्ये प्रदेश विधानसभेतही भाजपला जोरदार धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याच्या गुप्तचर विभागाने राजस्थान शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला झटका बसणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. गुप्तचर खात्याने ३० ऑक्टोंबरला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे आपला सिक्रेट रिपोर्ट सोपवला असून यामध्ये भाजपला धक्का बसणार असून काँग्रेसला बहूमत मिळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपच्या चिंतेत वाढ झाली असल्याची दिसत आहे. याबाबतची बातमी इंडिया टुडेनं दिली आहे.

दरम्यान आगामी निवडणुकीत विधानसभेच्या २३० जागांपैकी काँग्रेसला १२८ तर भाजपला फक्त 92 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीला सहा तर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला तीन जागा मिळतील असंही या अहवालात म्हटलं असल्याची माहिती आहे.

गुप्तचर विभागाच्या हा अहवाल खरा ठरला तर मागच्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजप सरकारला सुरुंग लागणार असल्याचं दिसत आहे.तसेच टाइम्स नाऊ-सीएनएक्सनं दिलेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षण चाचणीचा अहवालात राजस्थानमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का बसणार असल्याचं म्हटलं असून काँग्रेसला बहूमत मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राजस्थानपाठोपाठ मध्य प्रदेशातही भाजपविरोधात अहवाल आल्यामुळे हा भाजपला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

 

COMMENTS