मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार !

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार !

भोपाळ – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला आहे. यावेळी 28 मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपचे 16, सिंधिया यांचे 9 समर्थक आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या 3 नेत्यांना मंत्रमंडळात स्थान देण्यात आले आहे.

दरम्यान शिवराजसिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. यापूर्वी सत्तेची सर्व सूत्र आणि निर्णयाचे अधिकार त्यांच्या हातात असायचे, परंतु यावेळी तसे नाही. कारण भाजपाकडे पूर्ण बहुमत नाही. काँग्रेस बंडखोरांमुळेच त्यांचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा असून अमृत ​​मंथनातून विष बाहेर पडते, विष तर ‘शिव’ भगवान यांनाच प्राशन करावे लागते. असे सूचक वक्तव्य काल मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले होते. शिवराज यांच्या वक्तव्याचे अनेक अर्थ लावले जात आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे समर्थकांचे वर्चस्व पाहून शिवराज दु:खी आहेत का? असा सवालही विचारला जात आहे.

COMMENTS