“लालूंच्या घरात ‘महाभारत’, लवकरच दिसणार परिणाम !”

“लालूंच्या घरात ‘महाभारत’, लवकरच दिसणार परिणाम !”

बिहार – लालू प्रसाद यादव यांच्या घरात महाभारत घडण्यास सुरुवात झाली असून त्याचे परिणाम लवकरच दिसणार असल्याचं वक्तव्य बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी केलं आहे. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं छेडलेल्या भारत बंद आंदोलनाला आरजेडीसह इतर अपक्षांनी पाठिंबा दर्शवला होता. तसेच मागच्या मंगळवारी आरजेडीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला आणि काँग्रेसच्या आंदोलनात लालूंचे मोठे चिरंजीव तेज प्रताप यादव यांनी अनुपस्थिती लावली होती. त्यामुळे यावरुन लालुंच्या परिवारात महाभारत घडत असल्याचा आरोप मोदी यांनी केला आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजही देशातील जनतेचे आवडते पंतप्रधान आहेत. बिहारमधील 65 टक्के मतदार हे एनडीएसोबत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये भाजपलाच यश मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. आज घेण्यात आलेल्या भाजपच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते.

COMMENTS