त्यामुळे शिवसेना नेत्याला कंटेनरखाली चिरडले, सुरेश कालगुडे यांच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती उघड !

त्यामुळे शिवसेना नेत्याला कंटेनरखाली चिरडले, सुरेश कालगुडे यांच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती उघड !

महाड  –  शिवसेनेचे रायगड जिल्‍हा परीषदेतील माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे यांच्‍या मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या मृत्‍यूप्रकरणी  कंटेनरचालक शिवपती पटेल याला पोलिसांनी अटक केली आहे. शिवपतीने कंटेनर कालगुडे यांच्‍या अंगावर चालवत त्‍यांना कंटेनरखाली चिरडले त्‍यात त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला असल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण ?

सुरेश कालगुडे यांचा जेसीबी झुआरी अॅग्रो केमिकल्‍स कंपनीत भाडयाने देण्‍यात आला होता. रविवारी रात्री तेथे काम सुरू असताना जेसीबी चालक भारत कदम व कंटेनर चालक शिवपती यांच्‍यात वाद झाला होता. शिवपतीने भारत याला मारहाण केली म्‍हणून भारत याने कालगुडे यांना बोलावून घेतले. त्‍यावेळी कालगुडे व शिवपती यांच्‍यात बाचाबाची झाली. त्यानंतर रागाच्या भरात शिवपतीने कंटेनर कालगुडे यांच्‍या अंगावर चालवत त्‍यांना कंटेनरखाली चिरडले त्‍यात त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला असल्याची माहिती आहे. या सर्व घडामोडींमागे कंपनी व्‍यवस्‍थापनाचाही हात असल्‍याचा आरोप शिवसेनेनं केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

COMMENTS