महादेव जानकरांकडे 50 कोटींची खंडणी मागणाय्रांना अटक, आरोपी रासपचेच माजी कार्यकर्ते !

महादेव जानकरांकडे 50 कोटींची खंडणी मागणाय्रांना अटक, आरोपी रासपचेच माजी कार्यकर्ते !

बारामती – दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आणि शेळी मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांच्याकडे 50 कोटींची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.  क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत 50 कोटींची खंडणी या आरोपींनी मागीतली होती. त्यानंतर सापळा रचून पाच जणांना 15 कोटी रुपयांची रक्कम घेताना पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामतीत अटक केली आहे.

दरम्यान या प्रकरणी डॉ. इंद्रकुमार भिसे, सचिन पडळकर, दत्ता करे, तात्या कारंडे, विकास अलदर या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी याअगोदर रासपचेच कार्यकर्ते होते. सुरुवातीला 15 कोटींची रक्कम मागण्यात आली होती. पण प्रत्यक्ष साडे चार लाख रुपये जमा केले आणि खाली कागदाचे बंडल भरले आणि सापळा रचला. यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

फिर्यादी बाळासाहेब रुपनवर यांच्या फिर्यादीनुसार “सचिन पडळकर याने जानकरांना फोन करुन एक कोटी रुपये मागितले. निवडणूक लढण्यासाठी पैसे हवे असल्याचं त्याने सांगितलं. शिवाय बदनामीची धमकीही दिली. पैसे देत नसल्यामुळे वाारंवार फोनही करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली आहे.

COMMENTS