विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबत राहणार?, महादेव जानकर म्हणाले…

विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबत राहणार?, महादेव जानकर म्हणाले…

मुंबई – भाजपनं राष्ट्रीय समाज पक्षावर अन्याय केला असल्याचे वक्तव्य महादेव जानकर यांनी केले आहे. दौंडचे उमेदवार राहुल कुल आणि जिंतूरच्या उमेदवार मेघना बोर्डीकर हे रासपचे उमेदवार नाहीत कारण त्यांनी भाजपच्या बी फॉर्मवर अर्ज भरले आहेत. या दोन्ही उनेदवारांना मी माझ्या पक्षातून बेदखल करतोय, असं जानकर यांनी म्हटलं आहे.

तसेच जागावाटपावरून महादेव जानकर यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली असली तरीही आपण विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबतच असल्याचंही स्पष्ट केलं आहे. ‘आम्ही भाजप शिवसेना युतीसोबतच आहोत. त्यांच्या जागांवर प्रचार करू. पण दौंड आणि जिंतूरचे उमेदवार ज्यांनी भाजपचा एबी फॉर्म भरला आहे ते आता आमच्यात नाहीत असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गंगाखेडला रासपचा अधिकृत उमेदवार असून रत्नाकर गुट्टे हे आता आमचे अधिकृत उमेदवार आहेत. गंगाखेडची जागा महायुतीत सेनेला सोडली आहे. मात्र तिथे आमचा उमेदवार लढणार आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी तिथून शिवसेनेच्या उमेदवाराला माघार घेण्यास सांगावे. अन्यथा मैत्रीपूर्ण लढत होईल असंही जानकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS