ताई तुमचा आशीर्वाद राहू द्या, पुन्हा कुस्ती खेळायचीय  – महादेव जानकर

ताई तुमचा आशीर्वाद राहू द्या, पुन्हा कुस्ती खेळायचीय – महादेव जानकर

पुणे – पंकजा आणि प्रितम मुंडेंना निवडणुकीत कोणाचा बापही हरवू शकत नसल्याचं वक्तव्य राज्यमंत्री महादेव जानकर यांनी केलं आहे.तसेच त्या बीड आणि परळी येथून मोठ्या फरकाने निवडून येणार असल्याचंही यावेळी जानकर यांनी म्हटलं आहे. तसेच बारामती निवडणूक हरलो आणि नॅशनल हिरो झालो, ताई तुमचा आशीर्वाद राहू द्या पुन्हा कुस्ती खेळायची आहे.असं म्हणत बारामतीमधून पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा जानकर यांनी व्यक्त केली आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या ६९ व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान जो कोणी व्हाट्स अॅपवर  म्हणतोय की, मीच निवडून येणार त्याला चॅलेंज देऊन सांगतो की बीड आणि परळीमधून प्रीतम आणि पंकजा मुंडे मोठ्या फरकाने निवडून येतील. कोणाचा बापही त्यांना हरवू शकत नाही, अशी नाव न घेता टीका जानकर यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे. तसेच भगवी वस्त्र घातले तर महाराज बनेल मला कुठला स्वार्थ नाही, त्यामुळे पंकजा ताईंना सोडण्याचं कारणच नसल्याचंही जानकर यांनी यावेळी म्हटलं आहे.

 

COMMENTS