शिवसेना आमच्यासोबत यावी, तशी गणपती बाप्पा त्यांना सुबुध्दी देवो – गिरीश महाजन

शिवसेना आमच्यासोबत यावी, तशी गणपती बाप्पा त्यांना सुबुध्दी देवो – गिरीश महाजन

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. शिवसेनेनं अनेक वेळा स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. परंतु तरीही भाजपकडून शिवसेनेला एकत्र येण्याची विनवणी केली जात आहे. शिवसेनेनं आगामी निवडणुकीत भाजपसोबत युती करावी अशी इच्छा पुन्हा एकदा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे. गणराया आम्हाला पावतील,  आमचा मित्रपक्ष शिवसेना आमच्या बरोबर यावे अशी शक्ती गणराया त्यांना देवोत,  त्यांना सुबुद्धी देवोत असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे.

दरम्यान येत्या वर्षभरात निवडणुका आहेत, जनतेचीच मागणी आहे की पुन्हा केंद्रात – राज्यात भाजपाचे सरकार यावे. केंद्रात मोदी पुन्हा पंतप्रधान तर राज्यात देवेंद्र यांचे सरकार यावे, तशी मी गणपतीकडे इच्छा व्यक्त करतो असंही महाजन यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS