राज्यातील पोटनिवडणुकांचे एकत्रित निकाल,  वाचा कोणी, कुठे मारली बाजी?

राज्यातील पोटनिवडणुकांचे एकत्रित निकाल, वाचा कोणी, कुठे मारली बाजी?

मुंबई – राज्यातील महापालिका आणि नगर परिषदांमध्ये काल घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकींचे निकाल हाती आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत.

कोल्हापूर महापालिका पोटनिवडणूक

काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अपेक्षित जागा मिळवता आल्या नाहीत. परंतु या पराभवानंतरही महापालिका पोटनिवडणुकीत मात्र आघाडीची सरशी पहायला मिळत आहे. कारण कोल्हापूर महापालिकेतील सिध्दार्थनगर आणि पद्मराज याठिकाणी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत आघाडीनं यश मिळवलं आहे. सिध्दार्थनगर प्रभागात काँग्रेसचे जयकुमार पटकारे विजयी झाले आहेत. तर पद्मराज प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित राऊत विजयी झाले आहे.

दरम्यान या दोन्ही प्रभागातील राषट्रवादीचे नगरसेवक अजिंक्य चव्हाण आणि अफजल फिरजादे यांची निवड रद्द झाल्याने याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या दोघांवरही पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. परंतु महापालिकेतील सिध्दार्थनगर आणि पद्मराज याठिकाणी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीतही आघाडीनं यश मिळवलं आहे. सिध्दार्थनगर प्रभागात काँग्रेसचे जयकुमार पटकारे विजयी झाले आहेत. तर पद्मराज प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित राऊत विजयी झाले आहे. त्यामुळे या विजयाचा आघाडीला विधानसभा निवडणुकीत फायदा होईल असं बोललं जात आहे.

चंद्रपूर महापालिका पोटनिवडणूक

चंद्रपूर शहर मनपाच्या 2 जागांसाठीच्या पोटनिवडणूक निकालात काँग्रेस-भाजपला प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवता अला आहे. प्रभाग क्र 6 मध्ये काँग्रेसच्या कलावती यादव तर प्रभाग क्र 13 मधुन भाजपचे प्रदीप किरमे यांचा विजय झाला आहे. या प्रभागात जात प्रमाणपत्र सादर करू न शकल्याने बसपा नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात आले होते. याठिकाणी काल मतदान घेण्यात आले होते.
शहर मनपात भाजपची निर्विवाद सत्ता असून यात अता आणखी एका जागेची भर पडली आहे.

नाशिक – मालेगाव महापालिका पोटनिवडणूक

नाशिकमधील मालेगाव महापालिका पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला आहे. मालेगाव महापालिकेच्या प्रभाग क्र.6 क साठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार फैमिदा फारूक कुरेशी 506 मतांनी विजयी झाल्या असून त्यांनी जनता दलाच्या शकिला खान यांचा पराभव केला कुरेशी यांना 5348 तर खान 4842 मते पडली. विशेष म्हणजे गतवेळी पराभूत 4 हजार मतांच्या फरकाने पराभूत झालेल्या फैमिदा यांनी विजयश्री खेचून आणत जनता दलाचा बालेकिल्ला असलेल्या गडात जोरदार मुसंडी मारली आहे.

दरम्यान जनता दलाच्या नगरसेविका साजेदा मोहम्मद याकूब यांचे निधन झाल्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या विजयानंतर महापालिकेत काँग्रेस नगरसेवकांची संख्या 26 झाली आहे.काँग्रेस विजयी होताच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकाच जल्लोष केला.विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने दोन्ही पक्षांनी जोर लावला होता.

इंदापूर – बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणूक

इंदापूर – बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत का‌ँग्रेसच्या अंकिता पाटील बहुमताने विजयी झाल्या आहेत.अंकिता पाटील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत.17274 (सतरा हजार दोनशे चौर्याहत्तर) मतांनी अंकिता पाटील विजयी झाल्या आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या या जिल्हा परिषद सदस्यपदाच्या जागेवर 23 जून रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली होती.

दरम्यान या पोटनिवडणुकीत अंकिता पाटील यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. त्यामुळे याठिकाणी त्यांना दणदणीत विजय मिळाला आहे. अंकिता पाटील यांनी नुकताच सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. पहिल्या एन्ट्रीतच त्यांनी विजय मिळवला आहे.

नागपूर नगरपरिषद निवडणूक

नागपूरमधील बुटिबोरी नगरपरिषदेत भाजपचा एकतर्फी विजय झाला आहे. नगराध्यक्षपदी भाजपचे बबलू गौतम विजयी झाले आहेत. 19 पैकी 17 नगरसेवक भाजपचे तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 2 जागांवर विजय झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागी मिळवता आली नाही. बुटीबोरी नगर परिषद स्थापनेनंतर ही पहिलीच निवडणूक घेण्यात आली.

परभणी नगरपरिषद निवडणूक

तसेच परभणीतील मानवतच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे सखाहरी पाटील विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या पूजा खरात यांचा त्यांनी 9 हजार 439 मतांनी पराभव केला आहे. पाटील यांना 12 हजार 210 तर खरात यांना मिळाली 2 हजार 771 मते मिळाली आहेत.

उल्हासनगर महापालिका पोटनिवडणूक

उल्हासनगर महापालिकेतील पोटनिवडणुकीत रिपाई आठवले गटाचे मंगल वाघे विजयी झाले आहे. वाघे यांनी भाजप,सेना आणि साई या युतीच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. भाजप नगसेवकाचे जात प्रमाणपत्र अवैध झाल्याने नगरसेवक पद रद्द झाले होते. त्यामुळे
प्रभाग क्रमांक १ च्या पोट निवडणुकीत रिपाई आठवले गटानं बाजी मारली आहे.

शिर्डी – संगमनेर नगरपालिका पोटनिवडणूक

अहमदनगर, शिर्डी – संगमनेर नगरपालिकेत भाजपला धक्का बसला असून प्रभाग क्र.10 (अ) मध्ये घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार राजेंद्र वाकचौरे यांचा 711 मतांनी दणदणीत विजय झाला आहे. तर सोनई पंचायत समिती पोटनिवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार काका डफाळ यांचा 8264 मतांनी विजय झाला आहे.

पुणे वाडेबोल्हाई पंचायत समिती पोटनिवडणूक

पुण्यातील शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातील वाडेबोल्हाई पंचायत समिती पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी क‌ाँग्रेसच्या उमेदवाराचा दारूण पराभव झाला असुन सर्वपक्षीय आघाडीचे शामराव गावडे यांचा 1206 मतांनी झाला दणदणीत विजय झाला अहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांना जोरदार झटका बसला आहे.जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षाच्या गटातच त्यांच्या पंचायत समिती उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे हा मोठा धक्का असल्याचं दिसत आहे.

चंद्रपूर नगर परिषद पोटनिवडणूक

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात भाजपला जोरदार धक्का बसला आहे. मूल नगर परिषद पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला असून भाजप उमेदवार शिल्पा रामटेके यांचा काँग्रेस उमेदवार ललिता फुलझेले यांनी 176 मतांनी पराभव केला आहे. वॉर्ड क्रमांक 6 मध्ये भाजप नगरसेवक अपात्र झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली होती.

दरम्यान या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यामुळे भाजपला मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. कारण काही दिवसांवरच विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. अशातच सुधीर मुनगंटीवार यांच्या मूल नगर परिषद पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. भाजप उमेदवार शिल्पा रामटेके यांचा काँग्रेस उमेदवार ललिता फुलझेले यांनी 176 मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे भाजपसाठी ही धोक्याची घंटा असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS