राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, आजपासून आचारसंहिता लागू !

राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, आजपासून आचारसंहिता लागू !

मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील निवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.  महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. तसेच विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरपर्यंत आहे. तर हरियाणा आणि झारखंडमध्ये प्रत्येकी 90 आणि 82 जागा आहेत. तिन्ही राज्यातील विधानसभेचा कालावाधी लवकरच संपणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या तिन्ही राज्यातील निवडणुकांची घोषणा केली आहे.

दरम्यान महाराष्ट्र आणि हरियाणात आजपासून अचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात 21 तारखेला मतदान घेण्यात येणार आहे. तर 24 ऑक्टोबर रोजी मतमोजनी होणार आहे. तसेच 27 सप्टेेंबरपासून उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत. निवडणुकीत उमेदवारांनी प्लास्टिकचा वापर टाळावा असं आवाहनही निवडणूक आयोगानं उमेदवारांना केलं आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी २८८ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

अधिसूचना – २७ सप्टेंबर
नामनिर्देशन पत्र अंतिम मुदत- ४ ऑक्टोबर
छाननी – ५ ऑक्टोबर
माघार- ७ ऑक्टोबर
मतदान- २१ ऑक्टोबर
मतमोजणी- २४ ऑक्टोबर

2014 मधील पक्षीय बलाबल

एकूण जागा 288

भाजप – 122

शिवसेना – 63

काँग्रेस – 42

राष्ट्रवादी – 41

इतर – 20

COMMENTS