महाराष्ट्र बंदची धग, राज्यातील अनेक जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद !

महाराष्ट्र बंदची धग, राज्यातील अनेक जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद !

मुंबई – मराठा क्रांती मोर्चानं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याची धग राज्यभरात दिसून येत असून राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. तसेच अनेक जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सांगली, कोल्हापूर पंढरपूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. औरंगाबादमध्येही काही मोबाइल कंपन्यांची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.तसेच नाशिक, ठाणे आणि नवी मुंबई या तीन शहरांत बंद पाळला जाणार नसून सुरक्षेच्या कारणास्तव ठाणे-नवी मुंबईतील शाळा मात्र बंद ठेवल्या जाणार आहेत

दरम्यान दूध, शाळा-महाविद्यालये आणि वैद्यकीय सेवांना या बंदमधून वगळण्यात आले असून बंद सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत बंद पाळण्यात आला आहे. क्रांती दिनाचं औचित्य साधूनहा बंद पाळण्यात आला असून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, आरक्षण जाहीर होईपर्यंत मेगा भरती स्थगित या मागण्या मराठा समाजानं केल्या आहेत.

COMMENTS