मराठा क्रांती मोर्चाकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक !

मराठा क्रांती मोर्चाकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक !

मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यातील मराठा बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन चिघळत चाललं असून मराठा क्रांती मोर्चानं उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मराठा समाज समन्वयक आणि पोलिसांच्या बैठकीतनंतर महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली असून या बंदमध्ये नवी मुंबई आणि ठाणे वगळण्यात आलं आहे. त्यामुळे नवी मुंबई आणि ठाणे वगळता राज्यातील इतर ठिकाणी बंद पाळला जाणार आहे.

दरम्यान नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन करुन निषेध नोंदवला जाणार आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व शैक्षणिक संस्था व महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार असल्याचं प्रशासनानं जाहीर केलं आहे. तसेच औरंगाबाद आणि नांदेडमधील शाळा महाविद्यालयांना देखील सुट्टी देण्यात आली आहे.

COMMENTS