राज्यात धनगर आरक्षण आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, ठिकठिकाणी रास्तारोको आणि चक्का जाम !

राज्यात धनगर आरक्षण आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, ठिकठिकाणी रास्तारोको आणि चक्का जाम !

मुंबई – राज्यात आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यात आजपासून धनगर समाजाच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाला पहिल्याच दिवशी राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचं दिसत आहे. अनेक ठिकाणी लाखो धनगर बांधव रस्त्यावर उतरले आहेत.

लातूर

लातूरमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला असून बाभळगाव-निटुर रोडवर भुसणी पाटीजवळ रास्ता रोको करण्यात आला आहे. त्यामुळे लातूर- निटुर -निलंगा रस्त्यावरील वाहतुक खोळंबली होती.

 धुळे जिल्हा

धुळ्यातही मराठा समाजासोबत आता धनगर आरक्षणासाठी समाज बांधव रस्त्यावर उतरले आहेत. ठिकठिकाणी चक्काजाम करण्यात आला आहे.

 नागपूर

नागपूरमधील सुरत महामार्गावर फागणे गावाजवळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे. नागपुर वर्धा रोडवर धनगर समाजाचे चक्का जाम आंदोलन. खासदार विकास म्हातमे यांच्या नेतृत्वात 100 आंदोलकांनी शेळया मेंढ्यांसह रास्ता रोको केला.

यवतमाळ

यवतमाळमध्ये बसस्थानक चौकात धनगर बांधवांनी चक्काजाम आंदोलन केलं आहे. तसेच नागपूर तुळजापूर राज्य मार्गावर रास्तारोको करण्यात आला आहे.

 

बीड

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी बीड मध्ये बारा ठिकाणी चक्का जाम आंदोलन सुरू आहे. युवा मल्हार सेनेच्या वतीने धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आलं आहे. औरंगाबादकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली असून वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तसेच पोलिसांचा तगडा बंदोबस्त याठिकाणी पहावयास मिळाला आहे.

जालना

जिल्ह्यात धनगर समाजाकडून चक्का जाम आंदोलन,अंबड चौफुली भागात टायर जाळून चक्का जाम,अंबडकडे जाणारी वाहतूक विस्कळीत, एक तासापासून सुरू आहे रास्ता रोको.

जालना

आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात धनगर समाजाकडून चक्का जाम.

नांदेड

धनगर आरक्षणासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्तारोको करण्यात आला असून लोह्यात मेंढ्या घेऊन धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. तर नायगावमध्ये बाजारपेठ बंद आहेत. देगलूर ,बिलोली ,सोनखेड येथे रास्तारोको करण्यात आला आहे.

 

 

 

COMMENTS