राज्यसभा निवडणूक बिनविरोध,  १८ मार्चला अधिकृत घोषणा!

राज्यसभा निवडणूक बिनविरोध, १८ मार्चला अधिकृत घोषणा!

मुंबई – राज्यातल्या राज्यसभेच्या सात जागांसाठी सातच अर्ज आल्याने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड होणार आहे. राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार, फौजिया खान, काँग्रेसतर्फे राजीव सातव, भाजपतर्फे उदयनराजे भोसले, रामदास आठवले आणि भागवत कराड आणि शिवसेनेतर्फे प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे ही निवड बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले असून १८ मार्चला या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

राज्यसभा नियुक्तीसाठी निकष

राज्यसभेत जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मतं आवश्यक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. तर शिल्लक राहिलेल्या मतांमधून भाजप आणखी एक उमेदवार निवडून आणणार आहे.

26 मार्चला राज्यसभा निवडणूक

देशभारतील राज्यसभेच्या 55 जागांसाठी येत्या 26 मार्चला मतदान होणार आहे. तर त्याच दिवशी म्हणजे 26 मार्चला संध्याकाळी 5 वाजता निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रातील 7 जागांचाही यामध्ये समावेश आहे. एकूण 17 राज्यांतून 55 सदस्य राज्यसभेवर निवडून जाणार आहेत. राज्यसभेतून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रामदास आठवले, भाजप समर्थक अपक्ष खासदार संजय काकडे यांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपणार आहे. त्यामुळे या सात जागांसह देशातील 55 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे.

COMMENTS