राज्यात तीन महिन्यात 639 शेतक-यांच्या आत्महत्या, सरकारकडून मात्र 188 कुटुंबियांनाच मदत !

राज्यात तीन महिन्यात 639 शेतक-यांच्या आत्महत्या, सरकारकडून मात्र 188 कुटुंबियांनाच मदत !

नागपूर – राज्यात अवघ्या तीन महिन्यात 639 शेतक-यांनी आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लहरी हवामान, कर्जबाजारीपणा अशा विविध कारणांमुळे 1 मार्च 2018 ते 31 मे 2018 दरम्यान एकूण 639 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याबातची माहिती विधानपरिषदेत प्रश्नोत्तरात मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लेखी उत्तरात दिली आहे.

दरम्यान या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सरकारनं केलं असल्याचं दिसत आहे. कारण 639 शेतकऱ्यांपैकी 188 प्रकरणे निकषात बसल्यामुळे मदतीसाठी पात्र ठरली असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे इतर 122 प्रकरण निकषात न बसल्यामुळे मदतीसाठी अपात्र ठरवण्यात आली आहेत. तर 329 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तर 188 पात्र प्रकारणांपैकी 174 प्रकरणात आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या वारसांना मदत देण्यात आली असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS