भाजप आमदारांवर निलंबनाची कारवाई ?

भाजप आमदारांवर निलंबनाची कारवाई ?

नागपूर – हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी बाकावर असलेल्या भाजप आमदारांनी विरोधकांनी सावरकर प्रकरणावरुन घोषणाबाजी केली. तसेच काही आमदारांनी सभागृहात बॅनरबाजी केली. सभागृहात बॅनर चालणार नाही असं अध्यक्षांनी यापूर्वीच सांगितले होते. मात्र तरीही काही आमदारांनी काल विधानसभेच्या सभागृहात बॅनर झळकवले. त्यामुळे बॅनरबाजी करणाऱ्या भाजप आमदारांविरोधात निलंबनाची कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान काल भाजपचे आमदार ‘मी सावरकर’ असं लिहिलेल्या टोप्या घालूनच विधान भवनात आले होते. कामकाज सुरू होण्याआधी त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं करून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील स्वत: फलक घेऊन पायऱ्यांवर उभे होते. भाजपच्या या आक्रमक पवित्र्यामुळे हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस चांगलाच गाजला. परंतु सभागृहात बॅनर चालणार नाही असं अध्यक्षांनी यापूर्वीच सांगितले होते. मात्र तरीही काही आमदारांनी काल विधानसभेच्या सभागृहात बॅनर झळकवले. त्यामुळे बॅनरबाजी करणाऱ्या भाजप आमदारांविरोधात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS