सत्तास्थापनेचा तिढा सुटणार?, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं मागितली राज्यपालांच्या भेटीची वेळ!

सत्तास्थापनेचा तिढा सुटणार?, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं मागितली राज्यपालांच्या भेटीची वेळ!

मुंबई – राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आता लवकरच सुटणार असल्याचं दिसत आहे. कारण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितल्याची माहिती आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी उद्या दुपारी तीन वाजताची वेळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मागितल्याची माहिती आहे. त्यामुळे राजभवनावर तिन्ही पक्षांकडून नेमके कोणते नेते जाणार आणि कोणत्या विषयावर राज्यपालांशी चर्चा करणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. तसेच ‘महासेनाआघाडी’ सत्तास्थापनेचा दावा करणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा नवा फॉर्म्युला

सरकार स्थापनेसाठी तिन्ही पक्षांमध्ये नवा फॉर्म्युला ठरला असून 14-14-12 असं मंत्रिपदाचं सूत्र ठरल्याची माहिती आहे. पाच वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच असणार आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे एक-एक उपमुख्यमंत्रिपद असणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह 14 मंत्रिपदे, राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदासह 14 आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपदासह 12 मंत्रिपदे मिळण्याचे शक्यता आहे. तसेच महत्वाची चार खाती प्रत्येक पक्षाला वाटून देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS