सर्व मुद्यांवर संमती परंतु या पदावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच?

सर्व मुद्यांवर संमती परंतु या पदावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच?

मुंबई – राज्यात सत्तास्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावार एकमत झाल्याचं सांगितलं आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी मात्र याविषयी अधिक बोलण्यास नकार दिला. अजूनही बैठक सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. मला अर्धवट माहिती द्यायची नाही. जेव्हा आम्हाला काही सांगण्यासारखं असेल तेव्हा तीनही पक्ष सांगू. सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान या बैठकीत इतरही महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सर्वसंमती देण्यात आली. तसेच उद्या महाविकासआघाडीची उद्या पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु असल्याची माहिती आहे. कोणताही मुद्दा सुटू नये यासाठी प्रयत्न सर्व नेत्यांचा विचार घेतला जाणार. उद्या पत्रकार परिषदेनंतर सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता.

COMMENTS