मालेगाव बाह्य मतदारसंघात आघाडीचा उमेदवार ठरला, राष्ट्रवादीकडून यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

मालेगाव बाह्य मतदारसंघात आघाडीचा उमेदवार ठरला, राष्ट्रवादीकडून यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

मुंबई – मालेगाव बाह्य मतदारसंघातून शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांनी जोरदार आघाडी उभी केली आहे. विरोधी आघाडीच्या कोअर कमिटीच्या सदस्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांच्या नावावर एकमत केले आहे. कोअर कमिटी सदस्यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेत तशी बोलणी केली आहे. त्यामुळे शेवाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आली असल्याची चर्चा आहे.

दरम्यान आघाडीच्या जागावाटपात मालेगाव बाह्य मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आहे. शेवाळे काँग्रेस की राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणार याबाबत पेच असला तरी मालेगाव बाह्य मतदारसंघात गेल्या तीन टर्म आमदार असलेल्या राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासमोर यानिमित्ताने मोठे आव्हान उभे केले आहे. डॉ. शेवाळे यांच्या पाठीशी आघाडीचे सर्व नेते एकवटल्याने मालेगाव बाह्य मतदारसंघाच्या लढतीमध्ये चुरस निर्माण झाली आहे .

COMMENTS