मालेगांव महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा काँग्रेसला पाठिंबा!

मालेगांव महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा काँग्रेसला पाठिंबा!

नाशिक – मालेगावात सत्तेचा अनोखा पॅटर्न पहायला मिळाला असून महापौर व उपमहापौरपदासाठी भाजपनं काँग्रेस व शिवसेनेला साथ दिली आहे. मालेगांव महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या ताहेरा शेख यांचा विजय झाला आहे. तर उपमहापौरपदी शिवसेनेचे निलेश आहेर यांची वर्णी लागली आहे. ताहेरा शेख यांनी महागटबंधन आघाडीच्या शान-ए-हिंद निहाल अहमद यांचा 32 विरुद्ध 51 मतांनी पराभव केला आहे.

दरम्यान निर्णय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. गेली अडीच वर्षे काँग्रेस व शिवसेनेची महापालिकेवर सत्ता आहे. काँग्रेसचे रशीद शेख हे महापौर,तर शिवसेनेचे सखाराम घोडके उपमहापौर होते. या निवडणुकीतही काँग्रेस व शिवसेनेने महापौर-उपमहापौरपद टिकवून ठेवले आहे.

COMMENTS