सातारा – मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपला धक्का, काँग्रेसच्या निलम येडगे विजयी !

सातारा – मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपला धक्का, काँग्रेसच्या निलम येडगे विजयी !

सातारा – मलकापूर नगरपरिषद अंतिम निवडणूक निकाल हाती आला असून नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत काँग्रेसच्या उमेदवार निलम धनंजय येडगे यांचा विजय झाला आहे. याठिकाणी भाजपाच्या उमेदवार डॉ. सारिका प्रशांत गावडे यांचा येडगे यांनी पराभव केला आहे. एकुण 19 जागांसाठी घेण्यात आलेल्या या निवडणुकीत काँग्रेसचे 14 उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजपाचे 5 उमेदवार विजयी झाले आहेत.

त्यामुळे मलकापूर नगरपरिषदेवर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व पहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मलकापूर नगरपरिषद काँग्रेसकडे राखण्यात यश मिळविले आहे.  त्यामुळे भाजपाचे नेते आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांना मोठा धक्का बसला आहे.

COMMENTS