अरुण जेटली – विजय मल्ल्या माझ्यासमोर भेटले, चुकीचा ठरलो तर राजकारण सोडेन” ! Video

अरुण जेटली – विजय मल्ल्या माझ्यासमोर भेटले, चुकीचा ठरलो तर राजकारण सोडेन” ! Video

भारतीय बँकांना कोट्यवधींचा गंडा घातलेला विजय मल्ल्या याच्या अरुण जेटली यांच्या भेटीच्या प्रकरणावरुन काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षात जोरदार वादावादी सुरू आहे. आपली आणि जेटली यांची औपचारीक भेट झाली नाही मात्र आपण त्यांना लंडन जात आहे असं सांगितलं अशी सारवासारव विजय मल्ल्या याने केली आहे. तर आपण केवळ चालत चालत असताना मल्ल्याला भेटलो असं अरुण जेटली म्हणत आहेत. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार पुनिया यांनी मात्र आपल्यासमोर संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जेटली आणि मल्ल्या बराच वेळ बोलल्याचं त्यांनी सांगितलं. माझं म्हणणं चुकीचं वाटत असेल तर 1 मार्च 2016 चे सीसीटीव्ही काढून पहा. मी चुकीचे ठरलो तर राजकारण सोडेन असंही पुनीया म्हणाले.


दरम्यान पुनिया यांच्या या दाव्यावर भाजपनं आक्षेप घेतला आहे. पुनिया गेली अडीच वर्ष का बोलले नाहीत ?  असा सवाल भाजपनं केला आहे. पुनिया पूर्णपणे गोंधळल्यासारखे बोलत आहेत किंवा त्यांच्यावर असं बोलण्यासाठी दबाव आहे असा आरोप भाजप नेते आणि रेल्वेमंत्री पियूश गोयल यांनी केला आहे. मल्ल्याचा चुकीच्या पद्धतीनं कर्ज यूपीएनं दिलं. त्याची उत्तरं काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी द्यायला हवी असंही गोयल म्हणाले.

COMMENTS