हार्दिक पटेल तृणमुल काँग्रेसमध्ये जाणार ?

हार्दिक पटेल तृणमुल काँग्रेसमध्ये जाणार ?

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना त्यांच्या होमपिचवर कडवी झुंज दिलेला पाटीदार समाजाचा नेते हार्दिक पटेल हा ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. हार्दीक पटेल याने शुक्रवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकत्या भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये देशातील सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल चर्चा झाली. याच बैठकीत ममता बॅनर्जी यांनी हार्दिक पटेल याला तृणमुलमध्ये प्रवेश करुन गुजतातमध्ये नेतृत्व करण्याची ऑफर दिली. हार्दिक पटेल यानेही आपल्याला ममता बॅनर्जी यांनी अशी ऑफर दिल्याची कबुली दिली आहे. याबाबत आपण योग्य वेळी निर्णय घेऊ असं हार्दिक पटेल यांनी पत्रकारांना सांगितलं.

देशात विरोधी पक्षांच्या आघाडीचं नेतृत्व ममता बॅनर्जी यांनी करावं असं हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी यांच्याकडे तसे नेतृत्व गुण असल्याचं हार्दिक पटेल यांना वाटतंय. इंदिरा गांधी यांच्यासारखे नेतृत्व गुण ममता बॅनर्जी यांच्याकडे असल्याचंही हार्दिक पटेल यांनी सांगितलं. तसंच 2019 मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालमध्ये जाणार असल्याचंही हार्दिक पटेल यांनी सांगितलं. ममता बॅनर्जी यांनीही हार्दिक यांचं तोंडभरुन कौतुक केलं. एवढ्या लहान वयातही हार्दिक यांना राजकारणाची चांगली समज आहे. आणि त्यांना राजकारणात चांगलं भवितव्य असल्याचंही ममता म्हणाल्या. तसंच तो आपल्या लहान भावासारखा असून त्यांना आपण तृणमुल काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

COMMENTS