ममता बॅनर्जींनी घेतली शरद पवार आणि संजय राऊतांची भेट !

ममता बॅनर्जींनी घेतली शरद पवार आणि संजय राऊतांची भेट !

नवी दिल्ली – तृणमुल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. तसेच या भेटीत ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे अजून समजू शकलेल नाही.  तसचे संजय राऊत यांनी ममतादिदींची भेट घेतल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. मात्र भेटीत नेमकी कशावर चर्चा झाली, याची माहिती त्यांनी दिली नाही. यावरुन आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राजकीय खलबतं सुरु झालेली असल्याचं दिसत असून भाजपाविरोधात ‘तिसऱ्या आघाडी’ची चर्चा पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे.

दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनीही ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. उद्या संसदेत शेतक-यांची कर्जमुक्ती आणि दीडपट हमीभाव विधेयक मांडले जाणार असून याला तृणमूल काँग्रेसने पाठिंबा द्यावा याबाबत खासदार राजू शेट्टी यांनी ममता बॅनर्जींना विनंती केली असल्याची माहिती आहे.

तसेच तृणमूल काँग्रेसनंही विधेयकाला पाठिंबा दर्शवला असल्याची माहिती असून दिल्लीत होणा-या शेतकरी संघटनेच्या बैठकीला तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS