ममता बॅनर्जी यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका, पोलीस आयुक्तांना सीबीआयसमोर हजर राहण्याचे आदेश !

ममता बॅनर्जी यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका, पोलीस आयुक्तांना सीबीआयसमोर हजर राहण्याचे आदेश !

नवी दिल्ली – कोलकाता शहर पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआय समोर हजर होण्यात काय अडचण आहे असा सवाल करत न्यायालयाने ममता बॅनर्जी यांना झटका दिला आहे. तसेच कोलकाता पोलीस आयुक्तांनी सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर रहावे, असे आदेशही सुप्रीम कोर्टाने कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना दिले आहेत. राजीव कुमार यांनी तपासात सहकार्य करावे, असे सांगतानाच सीबीआयने देखील राजीव कुमार यांना अटक करु नये, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे बॅनर्जी यांना सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे.

चीटफंड गैरव्यवहारप्रकरणी कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या ‘सीबीआय’ अधिकाऱ्यांनाच तेथील पोलिसांनी गाडीत कोंबून पोलीस ठाण्यात आणल्याची घटना रविवारी घडली. लॉडन स्ट्रिटवर रंगलेल्या या नाट्याचे स्वरूप ममता बॅनर्जी विरुद्ध केंद्र सरकार असे होते. हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे.

राजीव कुमार हे चिट फंड घोटाळ्यातील विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. सीबीआयकडे तपासाची कागदपत्रे सोपवताना कुमार यांनी सर्व कागदपत्रे दिलीच नाही. त्यांनी तपासासंदर्भातील कॉल रेकॉर्ड्समध्येही फेरफार केले असल्याचा आरोप त्यांनी केला. राजीव कुमार यांनी इलेक्ट्रॉनिक पुरावे देखील नष्ट केल्याचा दावा सीबीआयने सुप्रीम कोर्टासमोर केला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राजीव कुमार यांना सीबीआयसमोर हजर राहण्याचे आणि चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.

COMMENTS