मुंबई – काँग्रेस आमदारावर उधळले पैसे ! VIDEO

मुंबई – काँग्रेस आमदारावर उधळले पैसे ! VIDEO

मुंबई –  काँग्रेस आमदारावर पैसे उधळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काँग्रेसचे आमदार  नसीम खान यांच्यावर पैशांची उधळण करण्यात आली आहे. गणेशोत्सवात नसीम खान यांच्यावर पैशांची उधळण करण्यात आली असून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. नसीम खान हे एका गणेशोत्सवात गेले होते. या गणेशोत्सवात नसीम खान यांच्यावर दोन जणांनी पैशांची उधळण केली. ‘भानुशाली समाजाच्या गणेशोत्सवाला मी गेलो होतो. तिथे मंडपात दोन जणांनी माझ्यावर पैशांची उधळण केली. मी काही वेळेसाठीच तिथे गेलो होतो. मी त्यांना रोखण्याचाही प्रयत्न केला. पण त्यांच्या परंपरेत अडथळा आणणे मला योग्य  वाटले नाही. त्यामुळे यात दिलगिरी व्यक्त करण्यासारखं काहीही नसल्याचं नसीम खान यांनी म्हटलं आहे. यावरुन आता भाजप नेत्यांकडून जोरदार टीका त्यांच्यावर केली जात आहे.

COMMENTS