पंतप्रधान मोदींनी आश्वासन पाळलं नाही, तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न !

पंतप्रधान मोदींनी आश्वासन पाळलं नाही, तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न !

नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्वासन न पाळल्यामुळे एका तरुणानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यातील जरवल येथे ही घटना घडली असून जरवलमधल्या इलाहबाद बँकेच्या शाखेत आलेल्या एका तरुणाने स्वत:वर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मौजीलाला असं या तरुणाचं नाव असून हा तरूण मुळचा धनराजपूर गावचा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलेले १५ लाख रुपये मागण्यासाठी तो बँकेत आला होता. परंतु बँक कर्मचा-यांनी तरुणाची मागणी फेटाळल्यानंतर या तरुणानं हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

दरम्यान पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. आरोपी तरूणाची मानसिक स्थिती योग्य नसून त्याच्या या कृत्याबाबत त्याच्या कुटुंबियांनाही माहिती देण्यात आली आहे. या तरूणावर गुन्हा नोंद केला असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे.

 

COMMENTS