“…त्यामुळे मनमोहन सिंह यांना महाभियोग प्रस्तावापासून दूर ठेवलं !”

“…त्यामुळे मनमोहन सिंह यांना महाभियोग प्रस्तावापासून दूर ठेवलं !”

नवी दिल्ली – सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह अन्य विरोधीपक्षांनी महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी केली आहे. या प्रस्तावावर काँग्रेससह ७१ खासदारांनी स्वाक्षरी केली आहे. मात्र यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि पी. चिदंबरम यांची स्वाक्षरी घेण्यात आली नाही. मनमोहन सिंह हे माजी पंतप्रधान असल्यामुळे त्यांना यापासून दूर ठेवण्यात आलं असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. ‘माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची सही महाभियोग प्रस्तावावर आम्ही जाणूनबुजून घेतलेली नसल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. दरम्यान पी चिदंबरम यांच्या केसेस सुरु असल्याने त्यावर प्रभाव पडू नये म्हणून त्यांची स्वाक्षरी घेतली नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

न्यायाधीश लोया केसमधला निर्णय विरोधात लागला म्हणून लगेच महाभियोगाची तयारी केली नसल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसने दिलं असून जर न्यायसंस्थेला वाचवायचे असेल तर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पदावरून काढावंच लागेल अशी टिप्पणी करत विरोधकांनी मिश्रा यांच्यावर महाभियोग चालवावा असा प्रस्ताव उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे या प्रस्तावाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS