‘त्या’ ऑडिओ क्लिपबाबत मनोहर पर्रिकर यांनी केला खुलासा !

‘त्या’ ऑडिओ क्लिपबाबत मनोहर पर्रिकर यांनी केला खुलासा !

गोवा – काँग्रेसनं जारी केलेल्या ऑडिओ क्लिपबाबत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न असून अशा प्रकारची कोणतीच चर्चा कॅबिनेट बैठकीत झाली नव्हती असा खुलासा पर्रिकर यांनी केला आहे. त्यांनी यासंबंधी ट्विट केले आहे. पर्रिकर यांनी कॅबिनेट बैठकीत आपल्याकडे राफेल घोटाळ्यासंबंधीत कागदपत्रे असून आपले कोणीच काही करू शकत नाही, असे म्हटले होते, असा दावा काँग्रेसचे नेते विश्वजित राणे यांनी.केला होता.

दरम्यान सुरजेवाला यांनी गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित प्रतापसिंह राणे यांची ऑडिओ क्लिप सादर केली होती. यात राणे हे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या बेडरूममध्ये राफेल घोटाळ्याशी संबंधित माहिती असल्याचे सांगत आहेत. मला कोणीही काही करू शकत नाही. माझ्याकडे राफेल घोटाळ्याची माहिती आहे.

माझ्या घरातील बेडरूमध्ये यासंबंधित कागदपत्रे आहेत असे पर्रिकर म्हणाल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले.परंतु राफेल प्रश्नी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पर्रिकर यांनी केला आहे.

COMMENTS