ब्रेकिंग न्यूज – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन !

ब्रेकिंग न्यूज – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन !

गोवा – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन झालं आहे. पर्रिकर यांच्या निधनाच्या वृत्ताने देशात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे. कालपासूनच त्यांची प्रकृती खालावली होती.सकाळी मनोहर पर्रिकर यांची तब्येत स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगण्यात आले होते. परंतु  काही वेळापूर्वीच पर्रिकर यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

दरम्यान गेली अनेक दिवसांपासून मनोहर पर्रिकर यांची प्रकृती चांगली बिघाडली होती. काही दिवस त्यांच्यावर अमेरिकेतील रुग्णालयातही उपचार करण्यात आले. गेली महिनाभरापासुन तर त्यांना  झोपूनच रहावे लागत होते. त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला होता. गेल्या पंधरा दिवसांत दोनवेळा त्यांचा रक्तदाब एकदम कमी झाला होता. मात्र, त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. परंतु कित्येक दिवसांपासूनची त्यांची मृत्युशी झुंज आज अपयशी ठरली आहे.

COMMENTS