बंगल्यांनंतर आता नवीन मंत्र्यांना मिळाले दालन, वाचा मंत्रालयात कोणत्या मंत्र्याचं कार्यालय कोणत्या मजल्यावर!

बंगल्यांनंतर आता नवीन मंत्र्यांना मिळाले दालन, वाचा मंत्रालयात कोणत्या मंत्र्याचं कार्यालय कोणत्या मजल्यावर!

मुंबई – नव्याने मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मंत्र्यांना राहण्यासाठी कालच बंगल्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर आता या मंत्र्यांसाठी मंत्रालयात दालनाचे वाटप करण्यात आले आहे. ते खालीलप्रमाणे…

1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – 6 वा मजला, मुख्य इमारत – 601

2. एकनाथ शिंदे – विस्तारित – 3 रा मजला, 302 ते 307

3. सुभाष देसाई, मुख्य इमारत, मध्य बाजू- 5 वा मजला – 502

4. जयंत पाटील, – विस्तार, 6 वा मजला, 607

5. छगन भुजबळ – मुख्य इमारत, मध्य बाजू, 2 रा मजला, 202

6. बाळासाहेब थोरात, विस्तार, 1 ला मजला, 108

7. डॉ नितीन राऊत, मुख्य इमारत, मध्य बाजू, 4 था मजला, 402

कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला?

नव्याने मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मंत्र्यांना राहण्यासाठी बंगल्याचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र शासनाचे सह सचिव सो. ना. बागुल यांनी राज्यापालांच्या नावाने हा बंगला वाटपाचा शासन निर्यण जाहीर केला आहे. त्यामुळे कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला मिळाला याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

वर्षा बंगला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगला देण्यात आला आहे. हा बंगला दक्षिण मुंबईमधील मलबार हिल येथे आहे.

सागर बंगला – विरोधी पक्षनेते, देवेंद्र फडणवीस

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल येथील सागर बंगला देण्यात आला आहे.

रामटेक बंगला, छगन भुजबळ

वर्षा’नंतर दुसरा महत्त्वाचा बंगला म्हणजे ‘रामटेक’ होय. समुद्र किनारी असलेला रामटेक हा आलिशान सरकारी बंगला मिळवण्यासाठी अनेकदा नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असते. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ पुन्हा एकदा ‘रामटेक’ बंगल्यावर परतणार आहेत. याआधी एकनाथ खडसे या बंगल्यामध्ये रहायचे. मात्र ते हा बंगला सोडून गेल्यापासून येथे कोणताही नेता राहण्यास तयार नव्हता. १९९९ नंतर राज्यात पंधरा वर्षांनी सत्तांत्तर होऊन भाजपचे सरकार आलं तेव्हा हा बंगला खडसेंना देण्यात आला.

‘रॉयल स्टोन’ बंगला – एकनाथ शिंदे

राज्याच्या माजी महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनाही त्यांचा ‘रॉयल स्टोन’ बंगला खाली करावा लागणार आहे.
रॉयल स्टोन’ हा बंगल्यात आता शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे राहणार आहेत.

‘सेवासदन’ बंगला – जयंत पाटील

माजी उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे सरकारी निवासस्थान असलेला ‘सेवासदन’ हा बंगलाही त्यांना आता खाली करावा लागणार आहे. सेवासदन’ हा मलबार हिल परिसरातील बंगला आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना देण्यात आला आहे.

COMMENTS