‘या’ राजकीय नेत्यांनी केले वाहतूक नियमाचे उल्लंघन, दंडही भरला नाही !

‘या’ राजकीय नेत्यांनी केले वाहतूक नियमाचे उल्लंघन, दंडही भरला नाही !

मुंबई – सामान्य नागरिकांनी वाहतुकींचा नियम मोडला तर त्याला दंड भरल्याशिवया सोडलं जात नाही. परंतु काही दिग्गज राजकीय नेते आणि अभिनेत्यांनी वाहतूकच्या नियमांचे उल्लंघनही केले आणि दंडही भरला नसल्याचं समोर आलं आहे. दंड न भरणाऱ्यांच्या यादीत मनसे प्रमुख राज ठाकरे, युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अभिनेता सलमान खान यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे आहेत.

दरम्यान राज्यभरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलं तर पोलीस दंड वसूल करतात. परंतु मुंबईत परिवहन विभागाकडून ई चलान पाठवण्यात येते. त्या ई चलाननुसार जो दंड असेल तर तो वाहन मालकांना भरावा लागतो. मात्र मुंबईतल्या अनेक दिग्गजांनी दंड भरलेला नसल्याची बातमी मुंबई मिररने दिली आहे. तसेच आत्तापर्यंत एकूण ११९ कोटींचा दंड वसूल करणे बाकी असून हा दंड न भरणाऱ्यांची एक यादीच तयार करण्यात आली आहे. या यादीत राज ठाकरे, आदित्य ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता सलमान खान, भाजपाचे नेते राम कदम यांची नावे आहेत.

COMMENTS