पंढरपुरात अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करणार, संजय राऊत यांची माहिती !

पंढरपुरात अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करणार, संजय राऊत यांची माहिती !

पंढरपूर – शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे सोमवारी पंढरपूरचा दौरा करणार आहेत. त्यांच्या महासभेची जोरदार तयारी सध्या पंढरपुरात सुरु आहे. या तयारीसाठी शिवसनेचे नेते संजय राऊत हे पंढरपुरात गेले आहेत. याबाबत आज राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राऊत यांनी इतर पक्षातील अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यान त्यांना भेटण्यासाठी विविध क्षेत्रातील सुमारे 125 ते 150 लोक इच्छुक आहेत. या सगळ्यांच्या भेटी कशा करुन द्यायच्या याचे नियोजन करत असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेनेचा उपयोग केवळ राजकीय फायद्यासाठी केला जातो आणि नंतर संबंधित लोक शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात अशा लोकांना त्यांची पायरी दाखवून दिली जाणार असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS