बार्शीत मराठा समाजाचं बेमुदत ठिय्या आंदोलन !

बार्शीत मराठा समाजाचं बेमुदत ठिय्या आंदोलन !

बार्शी – परळीत मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आजपासून बार्शी तहसिलसमोर मराठा समाजाच्यावतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा विधिमंडळात गाजत असून,सरकार याबाबत ठोस आश्वासन देत नाही, गेल्या 4 वर्षांपासून सरकारने मराठा आरक्षणाच घोंगड भिजत ठेवलं आहे. तसेच न्यायालयात सरकार भक्कम बाजू मांडत नसल्याचा आरोप आंदोलन कर्त्यांकडून केला जात आहे.

दरम्यान परळीतील मराठा समाजातील बांधव गेल्या अनेक दिवसांपासून,ऊन,वारा,पाऊस याची चिंता न करता आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन सुरू केल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलं आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून महिलांसह मराठा समाजातील युवक मोठ्याप्रमाणात आंदोलनात सहभागी झाले आहेत.

COMMENTS