राज्यात मंत्री आणि आमदारांना फिरू देणार नाही, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा !

राज्यात मंत्री आणि आमदारांना फिरू देणार नाही, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा !

मुंबई – मराठा क्रांती ठोक मोर्चानं पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर 1 डिसेंबरपासून राज्यात तीव्र आंदोलन करणार असल्याचं नानासाहेब जावळे-पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच तुळजापूरला आम्ही उपोषण करू त्यानंतरही सरकार जागे झाले नाही तर राज्यात उग्र आंदोलन होणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

दरम्यान ऑगस्टमध्ये बीड येथे झालेलं आंदोलन आम्ही शासनाच्या आश्वासनानंतर मागे घेतलं होतं. तेव्हाच आम्ही सरकारला मुदत दिली होती. 15 नोव्हेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर 1 डिसेंबरपासून राज्यात आम्ही आंदोलन करणार आहोत. तसेच राज्यात मंत्री आणि आमदारांना फिरू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या तरुणांना 35 जणांच्या कुटुंबियांना मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. सरकारने या तरुणांच्या कुटुंबियांना दिलेले मदतीचे आश्वासन पाळले नसल्याचंही यावेळी जावळे-पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS