तुळजापुरात मराठा समाजाचं जागरण गोंधळ आंदोलन !

तुळजापुरात मराठा समाजाचं जागरण गोंधळ आंदोलन !

तुळजापूर – आरक्षणाच्या मागणीवरुन पुन्हा एकदा मराठा समाजानं आंदोलनाची हाक दिली असून आज तुळजापूरमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी  तुळजाभवानी मंदिरासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येत आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर उभारलेल्या मंडपात जागरण गोंधळ आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला राज्यातील लाखो मराठा बांधवांनी उपस्थिती लावली असल्याचं दिसून येत आहे.  वेळोवेळी सामंजस्याच्या भूमिका घेऊनही सरकार दखल घेत नसल्याची टीका करत मराठा समाजानं आक्रमक भुमिका घेतली आहे. यापुढे आता मुक मोर्चे नाही तर ठोक मोर्चे काढणार असल्याची आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज तुळजापूरमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

दरम्यान शासनाच्या वेळकाढूपणाच्या धोरणामुळे समाजात प्रचंड अस्वस्थतेसह संताप पसरला आहे. या निद्रिस्त शासनाला जागे करून हादरा देण्यासाठी तुळजापूर आज सकल मराठा समाजाच्यावतीने देवीचा जागरण गोंधळ घालून लाखो समाजबांधवांच्या उपस्थितीत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यापुढे मूक मोर्चा नव्हे, तर ठोक मोर्चे निघतील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला आहे. आता सरकारशी कसलीही चर्चा केली जाणार नाही. तर सरकारने स्वतः समाजाकडे येऊन आश्‍वासनांची पूर्तता करावी अशी मागणी मराठा समाजानं केली आहे. त्यामुळे आता सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS