20 ऑगस्टपासून चक्री उपोषण करण्याचा मराठा बांधवांचा निर्णय !

20 ऑगस्टपासून चक्री उपोषण करण्याचा मराठा बांधवांचा निर्णय !

पुणे – मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. २० ऑगस्टपासून मराठा बांधवांनी बेमुदत चक्री उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण देणार केव्हा मुख्यमंत्र्यांनी लेखी देण्याची मागणी मराठा क्रांती मूक मोर्चानं केली आहे. ९ ऑगस्टला जे आंदोलन झाले त्यामध्ये काही ठिकाणी हिंसाचार झाला होता. त्यामुळे यापुढे आंदोलन रस्त्यावर होणार नसल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आता मराठा बांधवांनी आरक्षण आणि इतर सर्व प्रमुख मागण्यांसाठी चक्री उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ५८ मोर्चे शांततेच्या मार्गात काढून देखील राज्य सरकार ने त्याची दखल घेतली नाही.त्याच्या निषधार्थ ९ ऑगस्ट रोजी राज्यातील ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले.त्या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यावर चुकीच्या पध्द्तीने गुन्हे दाखल करण्यात आले आहे.ते पोलीसांनी मागे घ्यावे.तसेच मागील महिन्याभरापासून आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत.त्यांच्या कुटूंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत घेण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चानं केली आहे.

 

COMMENTS