आरक्षणासाठी हजारो मराठा महिला रस्त्यावर !

आरक्षणासाठी हजारो मराठा महिला रस्त्यावर !

बीड – राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठिकठिकाणी आंदोलन सुरुच आहे. आरक्षणाच्या मागणीवरुन बीडमध्ये आजे मराठा समाजाच्या महिलांही रस्त्यावर उतरल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो महिलांनी मोर्चा काढत सरकारचा निषेध केला आहे. सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बीडमधील हजारो महिलांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

दरम्यान  मराठ्यांना आरक्षण द्या नाहीतर खुर्च्या खाली करा,एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत महिलांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चेकरी महिलांनी जिल्हा प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. तसेच राज्यात इतर ठिकाणीही हे आंदोलन केलं जात असून आरक्षणाची घोषणा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा पवित्रा मराठा कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

 

 

COMMENTS