मराठा समाजाचा राजकीय पक्ष, दिवाळीच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात होणार पक्षाची स्थापना !

मराठा समाजाचा राजकीय पक्ष, दिवाळीच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात होणार पक्षाची स्थापना !

कोल्हापूर – मराठा समाजाकडून राजकीय पक्षाची स्थापना केली जाणार आहे. या पक्षाची दिवाळीच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी आज कोल्हापुऱात सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्याची बैठक पार पडली. या बैठकीत समाजाचा स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्या आज कोल्हापुरातील शिवाजी पेठेमधे बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला राज्यातील मराठा समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. या बैठकीत मराठा समाजाच्या अस्तित्वासाठी नवीन राजकीय पक्षाची गरज असल्याचे एकमत सर्वच कार्यकर्त्यांनी मांडलं. त्यानंतर सकल मराठा समाजाच्यावतीन राजकीय पक्षाची स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली असून दिवाळीच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात पक्षाची स्थापना केली जाणार आहे.

दरम्यान सध्या अस्तित्वात असलेले राजकीय पक्ष आणि नेते समाजासाठी काहीही करत नाहीत. प्रत्येकजण आपआपली राजकीय पोळी भाजून घेत असल्याचा आरोप समाजाकडून केला जात आहे. आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाजानं राज्यात तीव्र आंदोलन केलं परंतु अजून आरक्षण न मिळाल्यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र असंतोष आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एक मताने नवीन पक्षाची स्थापना केली जाणार आहे.

COMMENTS