मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणासह खुल्या वर्गातील जागाही उपलब्ध होणार !

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणासह खुल्या वर्गातील जागाही उपलब्ध होणार !

मुंबई – मराठा समाजाच्या मुलांना शासकीय नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षित जागांबरोबरच खुल्या वर्गातील जागाही उपलब्ध होणार आहेत. मराठा आरक्षणाचा कायदा झाल्यानंतर राज्य सरकारने ७२ हजार पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून मराठा समाजाला ज्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गात आरक्षण दिले आहे. सुधारित बिंदुनामावली विहित करण्यात आली आहे. या बिंदुनामावलीनुसार मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गात १६ टक्के आऱक्षण मिळणार आहे.

गुणवत्तेवर नियुक्त झालेल्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गातील उमेदवारांची संबंधित वर्गाच्या आरक्षित पदावर गणना करण्यात येऊ नये, त्यांची नियुक्ती संबंधित आऱक्षण बिंदुवर दर्शवू नये. त्यांची नोंद खुल्या प्रवर्गातील बिंदुवर दर्शविण्यात यावी, असे बिंदुनामावलीबाबत जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मुलांना नोकरीत आऱक्षित १६ टक्क्यांबरोबरच गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातील पदेही उपलब्ध होणार आहेत.

राज्य सरकारने जाहीर केलेली प्रवर्गनिहाय आरक्षित जागा

अनुसूचित जाती – 13 %

अनुसूचित जमाती – 7%

विमुक्त जाती (अ) – 3%

भटक्या जमाती (ब) – 2.5%

भटक्या जमाती (क) – 3.5%

भटक्या जमाती (ड) – 2%

विशेष मागास प्रवर्ग – 2%

इतर मागास वर्ग – 19%

सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग – 16%

खुला – 32 %

COMMENTS