मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात पुन्हा अर्ज! Video

मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात पुन्हा अर्ज! Video

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती दिल्यानंतर विनोद पाटील यांच्यावतीने दिनांक 11 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. नागेश्वर राव खंडपीठाने मराठा आरक्षणाला स्थगिती देताना इंद्रा सावनी खटल्याचा दाखला दिलेला आहे .आम्ही सरन्यायाधीशांना विनंती केलेली आहे की इंद्रा सावनी खटल्यामध्ये मागासवर्गीय आरक्षणाबाबत आहे. मराठा आरक्षण हे सामाजिक रित्या, शैक्षणिक मागास हा नवीन प्रवर्ग करून आरक्षण देण्यात आलेले आहे यामुळे या न्यायालयाला स्थगिती देता येत नाही. तसेच ह्या न्यायालयाने प्रकरण पाच न्यायमूर्तीकडे वर्ग केलेले आहे. त्यांना सुनावणी घेण्याचा अधिकार नाही तर स्थगिती देणे योग्य नसल्याचं विनोद पाटील यांनी म्हटलं आहे.

तसेच या निर्णयामुळे मराठा समाजातील तरुणांचे फार मोठ्याप्रमाणात शैक्षणिक व नोकऱ्यांमध्ये नुकसान होत आहे. सदर अर्ज़ हा प्रकरण जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री, महाराष्ट्र मुख्य सचिव व विनोद पाटील यामध्ये करण्यात आलेला आहे. पुढील सुनावणी तारीख लवकरात लवकर कळेल असं राज्यसरकारने देखील ताबडतोबीने अर्ज करावा असं विनोद पाटील यांच्यावतीने ऍड. संदीप देशमुख यांनी म्हटलं आहे.

COMMENTS