असे मिळू शकते मराठा आरक्षण

मुंबईः इंदिरा सहानी जजमेंट लक्षात घेऊन 11/9 बेंच समोर प्रकरण गेल्यावर फायदा होऊ शकतो, तशी आमची मागणी आहे, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणालेत. यासंदर्भात बैठक झाली असून, सखोल चर्चा झाल्याचं अशोक चव्हाणांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सह्याद्री या अतिथिगृहावर आज मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यानंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात 8 तारखेपासून नियमित सुनावणी सुरू होत आहे. आज यासंदर्भात बैठक झाली आणि सखोल चर्चा झाली. तामिळनाडूचे आरक्षण 50 टक्क्यांच्या वर गेलंय. हरियाणा आणि इतर राज्यातही तसेच आहे. आरक्षणाच्या बाबतीत काही राज्ये ही 50 टक्क्यांच्या वर जात आहेत. या सगळ्या गोष्टींबाबत आज बैठकीत चर्चा झाली.

इंदिरा सहानी जजमेंट लक्षात घेऊन 11/9 बेंच समोर प्रकरण गेल्यावर फायदा होऊ शकतो तशी आमची मागणी आहे, असंही अशोक चव्हाण यांनी अधोरेखित केलंय. अगोदरच्या सरकारने हे वकील नेमले आहेत, तेच वकील आताही आहेत. या सरकारने नवीन वकील नेमले नाहीयेत. काही विशेष वकिलांची टीम बनवण्यात आलीय, याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिलीय.

COMMENTS