मराठा आरक्षण संघर्ष समितीचा सरकारला इशारा, “…अन्यथा 10 तारखेला महाराष्ट्रात मंत्र्याला फिरू देणार नाही!”

मराठा आरक्षण संघर्ष समितीचा सरकारला इशारा, “…अन्यथा 10 तारखेला महाराष्ट्रात मंत्र्याला फिरू देणार नाही!”

कोल्हापूर – मराठा आरक्षण संघर्ष समिती आक्रमक झाली असून 9 ऑक्टोबर पर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर 10 तारखेला कडकडीत महाराष्ट्र बंद करणार असल्याचं या समितीनं म्हटलं आहे. तसेच हा बंद यशस्वी करण्यासाठी मराठा आरक्षण संघर्ष समिती काम करत असल्याचंही समितीतील सदस्यांनी म्हटलं आहे. या समितीनं 23 तारखेला गोलमेज परिषद आयोजित केली आहे.

काल बीडमध्ये एका मुलाने आत्महत्या केली. मराठा मुलांच्या भावनेला वाव देण्यासाठी 10 तारखेला महाराष्ट्र बंद करण्यात येणार आहे. तसेच EWS जे 10 टक्के राज्य सरकारने आरक्षण देऊ केलं ते सुरू तरी करा अशी मागणीही या समितीनं केली आहे. वेगवेगळी आंदोलनं, अनेक मुख्यमंत्र्यांसोबत बैठका, मुकमोर्चा, 42 जण शाहीद झाले तरी जाग आली नाही. त्यामुळे आता सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर राज्यात कोणताही मंत्री गावी फिरणार नाही असा इशाराही या समितीनं दिला आहे.

10 तारखेचा बंद म्हणजे महामार्ग जाम करणार, अत्यावश्यक सेवा सुरू ठेवणार आहे, भाज्या दूध ट्रक अडवणार, बस एसटी फिरू देणार नाही, आमदार आणि खासदारांना घेराव घालणार असल्याचंही या समितीनं म्हटलं आहे.

तसेच अजून वेळ गेलेली नाही. मागच्या सरकारमध्ये ठोक मोर्चे सुरू झाले , नुकसान झालं, जाळपोळ झाली. पण या सरकारला आवाहन समजत नसेल तर या सरकारलाही तशाच पद्धतीने समजवावं लागेल.10 तारखेला बंद आहे त्याची जबाबदारी ही सरकारचीच राहील. मराठा युवकांच्या भावनांवर आज आम्ही ही मागणी करत आहोत. समाजाची माणसं जरी वेगवेगळ्या पक्षाची असतील तरी समाजासाठी सगळे एकत्र येतील असंही या समितीनं म्हटलं आहे.

COMMENTS