मराठा कार्यकर्त्यांनी सदाभाऊंकडे भिरकावल्या बांगड्या !

मराठा कार्यकर्त्यांनी सदाभाऊंकडे भिरकावल्या बांगड्या !

कोल्हापूर – राज्यात अनेक ठिकाणी मराठा कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरुच आहे. या आंदोलनादरम्यान मराठा कार्यकर्त्यांनी थेट राजकीय नेत्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. काल खासदार हिना गावीत यांची गाडी संतप्त मराठा आंदोलकांनी फोडली होती. त्यानंतर आज कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दिशेने मराठा मोर्चातील कार्यकर्त्यांनी बांगड्या भिरकावल्या आहेत. तसेच काळे झेंडे दाखवून सदाभाऊ खोत यांचा निषेधही आंदोलकांनी नोंदवीला आहे.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडे याठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन सुरु आहे. यावेळी सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनाकडे लक्ष दिलं नाही. तसेच आक्रमक झालेल्या आंदोलकांना टाळून अन्य मार्गाने पिशवी गावात राज्यमंत्री सदाभाऊ खोत कार्यक्रमासाठी गेले होते. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्याकडे बांगड्या भिरकावल्या. दरम्यान बांगड्या भिरकावणाऱ्या १० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

COMMENTS