मराठा सर्वेक्षणाचं काम रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीला का ? काँग्रेस आणि मराठा क्रांती मोर्चाचा सवाल  !

मराठा सर्वेक्षणाचं काम रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीला का ? काँग्रेस आणि मराठा क्रांती मोर्चाचा सवाल  !

पुणे – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी करण्यात येणारे सर्वेक्षणाचे काम आरएसएसशी संबधित रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीला का ?  असा सवाल विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. संघाचा मराठा आरक्षणाला विरोध आहे त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भातील काम आरएसएसशी संबंधित संस्थेला देणे ही एक प्रकारे मराठा समाजाची थट्टाच असल्याचा आरोपही विखे पाटील यानी केला आहे. तसंच या सर्वेक्षणाचं काम टाटा सोशल सायन्स या संस्थेला का दिलं नाही असा सवालही विखे पाटील यांनी केलं आहे. असा प्रकार करुन सरकार मराठा आरक्षणासंदर्भात पुन्हा घोळ घालत असल्याचा आरोपही विखे पाटील यांनी केला आहे.

राज्य सरकार राज्य मागासवर्ग आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याला बगल देत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे संयोजन समितीचे सदस्य डॉ. संजय लाखे पाटील यांनी केलाय. यावरन राज्य सरकार मराठा आरक्षणाच्याबाबती गंभीर नसल्याचा आरोपही लाखे पाटील यांनी केला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही अस सांगत त्यांनी सर्वेक्षणाचे काम इतर संस्थांना देण्याची मागणीही लाखे पाटील यांनी केली आहे. यावर आता राज्य मागसवर्ग आयोग काय भूमिका घेते याकडं पहावं लागेल.

COMMENTS