मातोश्रीवर धमकीचे फोन करणाऱ्या आरोपींना अटक !

मातोश्रीवर धमकीचे फोन करणाऱ्या आरोपींना अटक !

मुंबई – मातोश्रीवर धमकीचे फोन करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे.एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी मोठी कारवाई करत कोलकाताहून आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी कोण आहेत. त्यांना का अटक करण्यात आली याबाबतची माहिती आज 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन दिली जाणार आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी धमकीचा फोन आला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन गेला होता. त्यानंतर क्राईम विभागाच्या माध्यमातून चौकशी सुरु करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करताना एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी आरोपींचा शोध लावत त्यांना कोलकाताहून ताब्यात घेतलं आहे. तर आरोपींची पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना यांना एका अज्ञात नंबरहून धमकीचे फोन आले असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली होती. इतंकच नाही तर खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, मातोश्रीवरील फोन कॉल दुबईहून आले होते. फोन करणारा व्यक्ती दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता. यावर सर्व सुरक्षा यंत्रणा तपास करत आहे.

COMMENTS