लोकसभा निवडणूक लढवणार का ? पार्थ पवार यांची प्रतिक्रिया !

लोकसभा निवडणूक लढवणार का ? पार्थ पवार यांची प्रतिक्रिया !

पुणे  – आगामी लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हे लढवणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी याबाबत धनंजय मुंडे यांनी देखील संकेत दिले होते. “उठ पार्था तुझ्याशिवाय पर्याय नाही”, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत पार्थ पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून मावळमध्ये मला पहिले 2 वर्ष काम करायला पाहिजे. तिथल्या लोकांना भेटून लोकांच्या अडचणी समजून घ्यायच्या असल्याचं पार्थ पवार यांनी सांगितलं आहे. तसेच मी जर उभा राहिलो आणि सर्वजण एकत्र येत असतील तर आगामी निवडणूक लढवण्यास काही हरकत नसल्याचही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात उभारणार असल्याचे संकेत पार्थ पवार यांनी दिले आहेत.

COMMENTS