महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली, खातेवाटपाबाबत मोठा निर्णय?

महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली, खातेवाटपाबाबत मोठा निर्णय?

मुंबई – मंत्रिमंडळातील खातेवाटपाबात महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत खातेवाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असल्याची माहिती आहे. आज रात्री 10 वाजेपर्यंत खातेवाटपाची यादी जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी 2 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनाही अजून खातेवाटप झाले नसल्यामुळे हे खातेवाटप कधी होईल याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. परंतु खातेवाटपाची घोषणा लवकरच होणार असल्याची माहिती आहो. खातेवाटपच झाले नसल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यताही अद्याप धुसरच आहे. याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदानंतरचं सर्वात महत्त्वाचं खातं म्हणजेच गृह खातं दिलं जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

COMMENTS