पंतप्रधानपदाच्या दावेदारीबाबत मायावतींचे मोठे वक्तव्य, दिले ‘हे’ संकेत !

पंतप्रधानपदाच्या दावेदारीबाबत मायावतींचे मोठे वक्तव्य, दिले ‘हे’ संकेत !

नवी दिल्ली – पंतप्रधानपदाच्या दावेदारीबाबत बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मला पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर मी उत्तर प्रदेशमधील आंबेडकर नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढेन असं मायावतींनी म्हटलं आहे. दिल्लीतल्या राजकारणाचा रस्ता हा आंबेडकर नगरमधून जातो. जर मला पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर मी याच मतदारसंघातून निवडणूक लढेन असं त्यांनी म्हटलं आहे. बसपातर्फे आंबेडकर नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत मायावती त्या बोलत होत्या.

दरम्यान या लोकसभा निवडणुकीत मायावतींचा पक्ष मोठ्या तयारीनिशी उतरला आहे, परंतु मायावती स्वतः निवडणूक लढत नाहीत. परंतु जर पंतप्रधानपद मिळवण्याची संधी मिळाली तर त्यांनी निवडणूक लढण्याची तयारी ठेवली आहे, तसेच त्यांनी मतदारसंघदेखील निवडला आहे. त्यामनळे मायावती यांच्या आगामी भूमिकेकडे सयलक्ष लागलं आहे.

COMMENTS