पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर, उपमहापौरांचा राजीनामा !

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर, उपमहापौरांचा राजीनामा !

पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर आणि उपमहापौरांनी आज अचानक राजीनामे दिले आहेत. महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी राजीनामे दिले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार त्यांनी राजीनामे दिले असल्याची माहिती आहे. तसेच हे दोन्ही पदे सव्वा वर्षात बदलण्याचा निर्णय सुरुवातीलाच घेण्यात आला होता. त्यानुसार आज महापौर आणि उपमहापौरांनी राजीनामे दिले असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार बदल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान महापौर नितीन काळजे यांच्या राजीनाम्यानंतर नामदेव ढाके, राहुल जाधव, शत्रुघ्न काटे, शीतल शिंदे या इच्छुकांची नावे पुढे येत आहेत. चिंचवड येथील मुख्यमंत्र्यांच्या सोमवारच्या दौऱ्यानंतर आज महापौर यांनी राजीनामा दिला, त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा होती. परंतु  महापौर नितीन काळजे यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा देत असून दीड महिना अधिक महापौरपद भुषविले असल्याचं म्हटलं आहे.

 

COMMENTS